Home Latest News महावितरणचा उद्योगस्नेही पुढाकार; ‘स्वागत कक्ष’ बैठकीत उद्योजकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा!

महावितरणचा उद्योगस्नेही पुढाकार; ‘स्वागत कक्ष’ बैठकीत उद्योजकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा!

0

<p><strong>वर्धा &colon;-<&sol;strong> राज्यातील औद्योगिक क्षेत्राला नवी ऊर्जा देण्यासाठी आणि उद्योगांना विनाव्यत्यय&comma; उच्च दर्जाचा व सुरक्षित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महावितरण प्रशासन कटिबद्ध आहे&period; याच धोरणाचा एक भाग म्हणून महावितरण वर्धा मंडळाच्या वतीने शुक्रवारी &lpar;दि&period; 25 सप्टेंबर&rpar; &&num;8216&semi;स्वागत कक्ष&&num;8217&semi; समिती आणि स्थानिक उद्योजकांची बैठक पार पडली&period; महावितरण वर्धा मंडळाच्या अधीक्षक अभियंता स्मीता पारखी यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली मंडळ कार्यालयात ही बैठक संपन्न झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक धोरणास अनुसरून आयोजित या बैठकीचा मुख्य उद्देश महावितरण आणि स्थानिक उद्योग जगतामधील थेट संवाद अधिक दृढ करणे हा होता&period; या बैठकीमध्ये वर्धा&comma; आर्वी आणि हिंगणघाट या तिन्ही विभागांतील प्रमुख वीज समस्या&comma; तांत्रिक अडचणी&comma; नवीन वीजजोडणीचे प्रलंबित अर्ज&comma; पायाभूत सुविधांचा विस्तार आणि बिलिंगविषयक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली&period; महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेत त्यावर तातडीने आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>या बैठकीस वर्धा&comma; आर्वी आणि हिंगणघाट विभागांचे वरिष्ठ महावितरण अधिकारी&comma; कार्यकारी अभियंते&comma; तांत्रिक पथकांचे प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतींमधील उद्योजक&comma; व्यावसायिक आणि विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते&period; उद्योगांना अखंडित वीज मिळाल्यास उत्पादनात वाढ होऊन स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील&comma; असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>महावितरणने घेतलेल्या या उद्योगस्नेही आणि तत्पर भूमिकेचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले&period; वीजविषयक अडचणींचे अशा प्रकारे थेट संवादातून वेळेत निवारण होत असल्याने स्थानिक उद्योजकांनी समाधान व्यक्त केले असून महावितरणच्या या ग्राहककेंद्री पुढाकाराचे सर्व स्तरांतून जोरदार स्वागत केले जात आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version