Home Latest News एकाच छताखाली वीज सेवा! महावितरणच्या अभियानाला पसंती

एकाच छताखाली वीज सेवा! महावितरणच्या अभियानाला पसंती

0

<p><strong>वर्धा &colon;-<&sol;strong> वीजग्राहकांना अत्यंत वेगवान&comma; अत्यंत पारदर्शक आणि सुलभ सेवा पुरवून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवण्यासाठी महावितरणने राज्यभरात सुरू केलेल्या &&num;8216&semi;सेवा सेतू&&num;8217&semi; आणि &&num;8216&semi;सेवा संकल्प अभियाना&&num;8217&semi;ला वर्धा जिल्ह्यात नागरिकांचा अभूतपूर्व आणि उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे&period; मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या गतिमान नेतृत्वाखाली 17 सप्टेंबरपासून राज्यभरात धडाक्यात सुरू झालेले हे अभियान येत्या 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत चालणार आहे&period; जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष उभारून महावितरणने सर्व प्रकारच्या पारंपरिक वीज आणि आधुनिक सौर सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देत ग्राहकांसाठी सुशासनाचा आदर्श निर्माण केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>याच पार्श्वभूमीवर सेलू येथील तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या महावितरणच्या विशेष कक्षाला तहसीलदार शकुंतला परांजपे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले&period; याप्रसंगी सेलूचे उपकार्यकारी अभियंता वाटकर&comma; हिंगणा येथील कनिष्ठ अभियंता कपूर आणि केलझर येथील कनिष्ठ अभियंता भलमे यांनी त्यांना अभियानाची सविस्तर माहिती दिली&period;<img class&equals;"alignnone wp-image-66362 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;Ashti&lowbar;copy&lowbar;800x396&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"396" &sol;><&sol;p>&NewLine;<p>ग्रामीण व शहरी भागात अभियानाचा झंझावात पाहायला मिळत असून आष्टी नगर परिषदेच्या प्रांगणात उभारलेल्या कक्षात &&num;8216&semi;पीएम सूर्यघर मोफत वीज योजना&&num;8217&semi;&comma; &&num;8216&semi;स्मार्ट&&num;8217&semi; योजना&comma; &&num;8216&semi;मागेल त्याला सौर कृषी पंप योजना&&num;8217&semi; आणि &&num;8216&semi;मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २&period;०&&num;8217&semi; यांसारख्या क्रांतिकारी योजनांचे मार्गदर्शन केले जात आहे&period; खरांगना उपविभागातील आठवडी बाजार व ग्रामपंचायत परिसरात आयोजित शिबिरांना नागरिकांनी गर्दी केली होती&period; येथे केवळ ऑनलाईन अर्ज किंवा माहितीच नाही&comma; तर सौर संच बसवण्यासाठी लागणारे कर्ज सहज मिळावे म्हणून स्थानिक बँक प्रतिनिधी आणि सौर कंत्राटदारांना एकाच ठिकाणी उपस्थित ठेवून थेट समन्वयाची उत्तम सोय करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दुसऱ्या बाजूला &&num;8216&semi;सेवा सेतू अभियाना&&num;8217&semi;द्वारे नवीन वीजजोडणी&comma; नादुरुस्त रोहित्र &lpar;ट्रांसफॉर्मर&rpar; विनाविलंब बदलणे&comma; बिलावरील नाव बदलणे आणि बिलिंगच्या तक्रारींचे थेट जागेवरच चुटकीसरशी निवारण केले जात आहे&period; तसेच वीज यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती आणि विद्युत सुरक्षेच्या उपाययोजनांना प्राधान्य देऊन महावितरणने ग्राहकांसाठी सुरक्षित व अखंड वीजपुरवठ्याची खात्री दिली आहे&period; सर्व सुविधा एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होत असल्याने महावितरणच्या या ग्राहककेंद्री आणि सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र जोरदार स्वागत होत आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version