spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे नाही – दानवे

नागपूर :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधानपरिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महायुती सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचा दावा केला. अतिवृष्टीनंतर जाहीर झालेल्या ३२ हजार कोटींची ‘ऐतिहासिक’ पॅकेजमधून केवळ १४ हजार कोटींची रक्कम वितरित झाल्याचे सरकारच सांगते आहे, जेव्हा की ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्याचे ढोल वाजवले होते. हे महायुती सरकार शेतकऱ्याच्या बाजूचे नाही, हेच कालच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते, असे ते म्हणाले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.