नागपूर २३ : नागपूर ग्रामीण जिल्ह्यात २१ जुलै २०२५ रोजी दारूबंदी कायद्याअंतर्गत विशेष मोहीम राबवून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैधरित्या देशीदारू व मोहाफुल दारू तयार करणारे, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. एकूण २७ गुन्हे नोंदवून देशी दारू, मोहाफुल दारू, सडवा व इतर साहित्य असा एकूण ३,०९,३८०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जलालखेडा पोलीस ठाण्यांत ११ गुन्ह्यांत प्रकाश माधवराव भोसले, अजय शेरू भोसले, बाबा सत्यम भोसले, राजेंद्र जर्नाधन पवार, गाना रोहील घोसले, जिगर जगदिश पवार, दिनेश रामचंद्र बनसरे व एका महिला आरोपीचा समावेश आहे. देवलापार पोलीस ठाण्यांत सुखदास बिन्सी मडावी, मनराज रामनाथ उईके, घनशाम बिजु उईके, पंजाब माधो टेकामख्त्र, अमृत राधेशाम कोकोडे व रमेश उर्फ लक्ष्मण भंगी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. भांगी पोलीस ठाणे हद्दीत शिवरात तोताराम पवार, पुरुषोत्तम रमेश काटोले आणि तीन महिला आरोपींवर प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. वेलतुर पोलीस ठाण्यात राजकुमार गरिबा बीरबल व रविंद्र बळीराम लाडे, कोंढाळी येथे विलास सुरेश माळोदे, कुही येथे सतिश वामनराव कुभरे आणि एमआयडीसी बोरी येथे रामकिसन श्रिराम माहुरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत दाखल या गुन्ह्यांमुळे जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाला मोठा दणका बसला असून पोलिसांची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.




