Home Latest News नागपुरात गुन्हे शाखा युनिट ५ ची मोठी कारवाई: शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक

नागपुरात गुन्हे शाखा युनिट ५ ची मोठी कारवाई: शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक

0
72

नागपूर १४ : नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट ५ च्या पोलिसांनी पिली नदी, संघर्ष नगर, यशोधरानगर येथील एका आरोपीला अग्नी शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. १२ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८:५३ ते १०:३१ च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट ५ चे अधिकारी व कर्मचारी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, मोहम्मद ईमरान मोहम्मद कमर अंसारी (वय ३०) हा रेकॉर्डवरील आरोपी अग्नी शस्त्र बाळगून आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

सखोल चौकशीत त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, त्यामुळे पंचांसमक्ष त्याच्या घराची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान, त्याच्या घरातून एक प्राणघातक अग्नीशस्त्र मॅगझीनसह आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. पोलिसांनी आरोपीकडून अग्नीशस्त्र, काडतुस आणि एक मोबाईल फोन असा एकूण ६३,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मोहम्मद ईमरानवर बेकायदेशीरपणे अग्नी शस्त्र बाळगल्याबद्दल आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल यशोधरानगर पोलीस ठाण्यात कलम ३/२५ भा.ह.का. आणि कलम १३५ म.पो.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही यशस्वी कामगिरी वरीष्टांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्यासह उपनिरीक्षक राहुल रोटे आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

@filephoto