Related Posts

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या अचूक प्रमाणीकरणासाठी ई-केवायसी प्रक्रियेत मोठी प्रगती – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 2 कोटी 63 लाख 83 हजार 589 अर्ज प्राप्त झाले होते&period; यापैकी 2 कोटी 43 लाख 82 हजार 936 अर्ज विभागाने पात्रतेनुसार ग्राह्य धरले&period; उर्वरित फॉर्म हे प्राथमिक पडताळणीतच अपात्र ठरले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या 26 लाख अर्जांच्या डेटाचे क्रॉस-व्हेरिफिकेशन करताना केवळ 4 लाख अर्जांचे पुनर्पडताळणीची आवश्यकता आढळली&period; उर्वरित सर्व अर्ज पात्र लाभार्थी म्हणून निश्चित करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>योजनेसाठी आवश्यक असलेली विभागनिहाय माहिती ही संबंधित विभागांकडून मागवण्यात आली होती&period; कृषी विभागाकडील नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी&comma; अन्न व नागरी पुरवठा विभाग&comma; शालेय शिक्षण विभाग तसेच माहिती तंत्रज्ञान विभागाकडील डेटाचा वापर करून लाभार्थ्यांची सखोल पडताळणी करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>लाभ घेण्यास अपात्र असलेले सुमारे 8 हजार शासकीय कर्मचारी &lpar;मुख्यतः आरोग्य व इतर सरकारी यंत्रणांमधील कर्मचारी&rpar; यांनी घेतलेले रकमेची रिकव्हरी प्रक्रिया मागील 5–6 महिन्यांपासून सुरू असून पुढील दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>साधारणपणे 12 ते 14 हजार महिलांच्या नावावर पुरुषांची बँक खाती जोडलेली असल्याचे पडताळणीत दिसून आले&period; अनेक महिलांची वैयक्तिक खाती नसल्यामुळे त्यांनी घरातील वडील&comma; भाऊ किंवा पती यांची खाती दिल्याचे स्पष्ट झाले&period; विभागाने अशा प्रकरणांचे सखोल परीक्षण करून कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही&comma; याची खात्री केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>लाभार्थींचे अचूक प्रमाणीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेत मोठी प्रगती झाली असून&comma; आत्तापर्यंत 1 कोटी 74 लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे&period; ई-केवायसीची अंतिम मुदत 31 डिसेंबर असून&comma; उर्वरित लाभार्थ्यांनाही ही सुविधा उपलब्ध आहे&period;<&sol;p>&NewLine;