नागपूर :- धरमपेठ झोनमधील प्रभाग 14 येथे मनपाच्या आयईसी चमूतर्फे स्वच्छता जनजागृती अंतर्गत एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. तेलंगखेडी मशिदी जवळ असलेला सुमारे 40 वर्षे जुना कचरा टब पूर्णपणे बंद करून त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसराला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित असे नवे रूप मिळाले आहे.
उद्घाटनाप्रसंगी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, झोनल ऑफिसर दीनदयाल टेंबेकर, आयईसी टीमचे अविनाश दामडे, स्मित कापसे, प्रतीक बारापात्रे, सौरभ पाटील, समीक्षा देशमुख, सिटी कोऑर्डिनेटर रसिका पालकर तसेच पीएनटी कॉलनीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यात पी एन टी कॉलनीतील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले.




