spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘ममता-HIMC’ तर्फे चिकना व कुंभार टोली येथे जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती उपक्रम

नागपूर ८ : (दि. ७ ऑगस्ट ) जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त, ममता हेल्थ इन्स्टिट्यूट फॉर मदर अँड चाईल्ड (MAMTA-HIMC) व ICDS केंद्राच्या संयुक्त विद्यमाने “जागृती-४” या प्रकल्पांतर्गत चिकना गाव व कुंभार टोली येथे नवमातांसाठी आणि कुटुंबीयांसाठी महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.
दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान साजरा केला जाणारा जागतिक स्तनपान सप्ताह, बाळाच्या पहिल्या सहा महिन्यांतील स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करतो. या पार्श्वभूमीवर, या वर्षी ममता-HIMC कडून ग्रामीण व शहरी स्तरावर प्रत्यक्ष संवाद, समुपदेशन तसेच विविध सर्जनशील उपक्रमांवर भर देण्यात आला.
कार्यक्रमात ICDS केंद्राच्या मास्टर ट्रेनर सौ. जयश्री भारद्वाज यांनी स्तनपानासंदर्भात सखोल माहिती देत, बाळाला योग्य पद्धतीने स्तनपान कसे करावे, शरीराची योग्य स्थिती, तोंड लावण्याची कृती, आणि स्तनपानात येणाऱ्या सामान्य अडचणी यावर मार्गदर्शन केले. ममता-HIMC चे राज्य समन्वयक सौ. पल्लवी भांडारकर सुद्धा उपस्थित राहून मातांशी थेट संवाद साधला.
उपक्रमाचे आकर्षण म्हणजे “कठपुतली नाटक” ज्याद्वारे स्तनपानाचे महत्त्व आणि चुकीच्या समजुती दूर करण्याचे सादरीकरण करण्यात आले. रांगोळी स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये स्तनपान विषयक सृजनशील रचना करून महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या स्पर्धेमुळे महिलांमध्ये विषयाविषयी सकारात्मक चर्चा व जागृती निर्माण झाली.
या कार्यक्रमात कुंभार टोली या एरियातील अंगणवाडी सेविका, चिकना गावचे सरपंच, व स्थानिक नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. संवादात्मक पद्धतीने राबवलेल्या या उपक्रमात नवमातांच्या शंका दूर करण्यात आल्या, आणि स्तनपानाचे फायदे समजावून सांगितले गेले. यामध्ये कुटुंबातील सदस्यांचाही सहभाग वाढवून स्तनपानास योग्य आधार देण्याचे आवाहन करण्यात आले.
स्तनपानामुळे बालमृत्युदर कमी होतो, आईचं आरोग्य सुधारतं आणि बाळाच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ होते, हे विविध उदाहरणांसह पटवून देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात ममता-HIMC चे योगेश राठोड आणि मंजुषा नासरे यांनी विशेष मेहनत घेतली. ममता-HIMC यांच्या समन्वयातून राबवलेला हा उपक्रम ग्रामीण व शहरी मातांसाठी उपयुक्त ठरला, अशी प्रतिक्रिया सहभागी महिलांनी दिली.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.