spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी ममता–HIMC प्रोजेक्ट ‘जागृती’तर्फे रामटेकेनगर व गड्डी गोदाम येथील जनजागृती अभियान

नागपूर :- महिलांवरील वाढत्या अत्याचारांविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय महिलावरील हिंसाचार निर्मूलन दिन निमित्त ममता–HIMC प्रोजेक्ट ‘जागृती’तर्फे रामटेके नगर व गड्डी गोदाम परिसरात विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ममता–HIMCच्या राज्य समन्वयिका पल्लवी भांडारकर यांनी भूषवले. तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून अडव्होकेट सुरेखा बोरकुटे आणि गुन्हेशाखेच्या समुपदेशिका जयमाला डोंगरे यांची उपस्थिती लाभली.

या उपक्रमात गर्भवती माता, स्तनदा माता, नवविवाहित दाम्पत्य, सासू तसेच समुदायातील महिला उत्साहाने सहभागी झाल्या. महिलांवरील भावनिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि डिजिटल स्वरूपातील अत्याचार कोणत्या प्रकारे होतात, त्यांची ओळख कशी करावी तसेच अत्याचार झाल्यास उपलब्ध मदतव्यवस्था आणि कायदेशीर हक्कांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान महिलांचे मानसिक आरोग्य, कुटुंबातील संवाद, वैयक्तिक सुरक्षितता, आत्मविश्वास वाढविण्याचे उपाय आणि अत्याचार रोखण्यासाठी समुदायाची भूमिका यावरही सखोल चर्चा करण्यात आली. ममता–HIMC प्रोजेक्ट ‘जागृती’तर्फे घेतल्या जाणाऱ्या अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये जागरूकता वाढून हिंसाचार प्रतिबंधाला मोठी मदत मिळत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Popular Articles