spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

परभणी जिल्ह्यातील अनेक माजी जि. प. सभापती, पं. स. सदस्य, नगराध्यक्षांचा भाजपामध्ये प्रवेश

– भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

मुंबई :- परभणी जिल्ह्यातील सात माजी जिल्हा परिषद सदस्य, सहा पंचायत समिती सदस्य, माजी नगराध्यक्ष आणि अनेक सरपंचांनी त्यांच्या समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. म. फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष तथा जि. प. माजी सभापती, राष्ट्रवादी शप गटाचे नानासाहेब राऊत, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी जि. प. सभापती संजय साडेगांवकर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पवनराव निकम, सेलूच्या माजी नगराध्यक्ष साबीया बेगम कपील फारुखी आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. संजय केनेकर, ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर, भाजपा विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

यावेळी बोर्डीकर म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्वावर विश्वास ठेवून देश आणि राज्याच्या विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विरोधी विचारांचे हे नेते आज भाजपाची साथ देत आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी ज्या विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्यांचा विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही श्रीमती बोर्डीकर यांनी दिली.

यावेळी नानासाहेब राऊत म्हणाले की, विचारधारा वेगळी असली तरी केवळ विरोधाला विरोध करणे हे आम्हा सर्वांना अमान्य असून विकासासाठी आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. जिंतूर तालुक्यातील 80 गावे येलदरी जलाशयाच्या पाण्यापासून वंचित होती. हा प्रश्न आणि सेलू तालुक्यातील 40 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाने पुढाकार घेतला. सेलू व जिंतूरच्या विकासासाठी भाजपाची आणि मेघना बोर्डीकर यांची मिळणारी साथ यामुळे परिसराचा विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परभणीत भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये शरद पवार गटाचे माजी जि. प. सदस्य अविनाश काळे, कृषि उत्पन्न बाजार समिती सदस्य व माजी जि. प. सदस्य राजेंद्र नागरे, पाथरी पं. स. सदस्य उबाठा गटाचे गोविंद गायकवाड, मानवत खरेदी विक्री संघ अध्यक्ष उबाठा गटाचे अशोक शिंदे, मानवत पं. स. सभापती उबाठा गटाचे बंडू मुळे, सरपंच गजानन घुगे, उमेश दराडे, अनिल लांडगे आदींचा समावेश आहे.

Popular Articles