spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मारोतराव गोरलेवार यांची संविधानिक अधिकार पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड

नागपूर :- संविधानिक अधिकार पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजामणी एस.राय यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारोतराव गोरलेवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.या नियुक्तीबाबत जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात, मारोतराव गोरलेवार यांनी पक्षाच्या संविधानवादी विचारधारेचा प्रसार करत देशभर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करावे, तसेच विविध सामाजिक व आनुषंगिक संघटनांशी समन्वय साधून पक्षाचा विस्तार करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. संविधानिक अधिकार पार्टी ही व्यक्तिवाद, जातिवाद, धर्मवाद, प्रांतवाद व वंशवाद या पलीकडे जाऊन संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि लोकशाही तत्त्वांवर आधारित राष्ट्रनिर्मिती साठी कार्यरत असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मारोतराव गोरलेवार यांचे विविध सामाजिक, राजकीय व नागरिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत असून, पक्षाच्या राष्ट्रीय विस्तारात त्यांच्या अनुभवाचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे ‘व गोरलेवार यांचे उच्च स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.