नागपूर :- दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी VNIT परिसरात अवैध ठेलेधारकांवर महानगरपालिकेच्या व संबंधित विभागांच्या संयुक्त पथकाद्वारे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईदरम्यान रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक जागांवर अनधिकृतरित्या उभे करण्यात आलेले ठेले, साहित्य व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. या मोहिमेमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली असून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.![]()
आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाई धरमपेठ झोन क्र. 02 व लक्ष्मीनगर झोन क्र. 01 चे सहा. आयुक्त, सेंट्रेल टिम तसेच बजाज नगर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक यांच्या संयुक्तीक कारवाई करण्यात आली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करू नये व नियमांचे पालन करावे. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने निरंतर राबविण्यात येणार आहेत.