spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माॅ आशापुरा जिनिंगला भीषण आग; आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक

पांढरकवडा :- मां आशापुरा जिनींग मिलमध्ये मंगळवारी दपारी ४ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मिलमधील लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. विशेष म्हणजे, पांढरकवडा नगर परिषदेची अग्निशमन गाड़ी ऐनवेळी नादरुस्त असल्याने आग विझवण्यात विलंब झाला, ज्यामुळे नगर परिषदेचा नुकसानीची तीव्रता अधिक वाढल्याचा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिमा टेक्स्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या कापूस आणि डुग्गा वाहनाच्या सायलेन्सरमधून उडालेल्या ठिणगीमुनळे ही आग लागल्याची चर्चा घटनास्थळी रंगली होती. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने मिलमध्ये साठवलेला कापूस आगीच्या भस्मस्थानी पडला. आगीची माहिती मिबळताच पांढरकवडा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्यांची गाड़ी घटनास्थळी पोहचू शकली नाही. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून वणी, घाटंजी, राळेगाव आणि यवतमाळ येथून अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करावे लागले, अनेक तासांच्या शर्तीच्या प्रयत्नांनंतर चारही शहरांच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले, या आगीत गिमा टेक्स्ट मिल मालकाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पांढरकवडा नगर परिषदेच्या अनिशमन गाडीच्या देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे मिलचा मोठा भाग जळून खाक झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्रचिन्ह उपस्थित केले जात आहे, आगीचे नेमके कारण आणि एकूण नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सध्या सुरू आहे.

Popular Articles