spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माऊली योग ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

नागपूर :- माऊली योग ग्रुपतर्फे तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सौजन्याने गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून गुरूंच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात इंदिरा मोजनकर व वर्षा यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. अखिल भारतीय संस्थेच्या महाराष्ट्र सचिव कविता रेवतकर यांनी आपल्या मार्गदर्शनात गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करतांना, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गुरु असते, हा प्रेरणादायी संदेश दिला. बोंडे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस व सत्कार केला.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ज्योती द्विवेदी यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुंचे मार्गदर्शन किती आवश्यक आहे, यावर भाष्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोंडे होते. यावेळी प्रकाश खोब्रागडे, योगगुरू शिला भुते, उषा शिंदे, माधुरी बालपांडे, मते, डॉ. बोरकर आणि शंकर जांभुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. योगामुळे शरीर निरोगी राहते व निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कुंदा गोडबोले यांनी तर माधुरी बोंडे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

Popular Articles