हंसराज, भंडारा :- श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भंडारा येथे आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात गुरु पूजा, तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक बिर्दीचंद लाहोटी, सतीश जाधव , मनोज पुडके, लक्ष्मी डेकाटे, अर्चना नंदनवार, संगीता चौधरी, बंटी विधवांनी, कुमुदिनी हटवार, कृषिभूषण तानाजी गायधने, नगर परिषद अध्यक्षा मधुरा मिलिंद मदनकर, प्रभाग क्रमांक ६ च्या वार्ड सेविका वृषाली ब्राम्हणकर, प्रगती कॉलनी पेट्रोल पंपच्या अध्यक्षा गीता कोठा व त्यांची टीम, पुष्पा नदरधने उद्योजिका तिरोडा तसेच कविता नितीन राऊत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच भंडारा नगर परिषद अध्यक्षा मधुरा मिलिंद मदनकर यांचाही आयोजक रजनी महेश सोनकुसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मोट्या प्रमाणात अनुयायी व नागरिक मोट्या प्रमाणात होते.