spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महापौर यांच्या हस्ते मनपा “पिंक मॅराथॉन”च्या बोधचिन्हाचे अनावरण

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्त रविवार ८ मार्च रोजी “पिंक मॅराथॉन” चे आयोजन धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे करण्यात येणार आहे. या “पिंक मॅराथॉन”च्या बोधचिन्हाचे गुरुवारी(ता.२६) महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर यांनी केले.

मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात पार पडलेल्या छोटेखानी समारंभात सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर, नगरसेवक प्रदीप पोहणे, नगरसेविका दुर्गेश्वरी कोसेकर, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ.पियुष आंबुलकर प्रामुख्याने उपस्थित होते.

महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मनपाद्वारे स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त “पिंक मॅराथॉन”चे आयोजन करण्यात येणार आहे. मॅराथॉन तीन गटात होणार असून, १६ वर्षांखालील महिलांसाठी 3 किमी, सर्वसामान्य गटासाठी ५ किमी व विशेष पिंक रन ही २ किलोमीटर अंतराची असणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून, स्पर्धकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवावा असे आवाहन महापौरांनी केले आहे. स्पर्धेची नोंदणी https://nmc-pink-run-form.emergent.host/ या गुगल लिंक वर करावयाची असून, लिंक म.न.पा. च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच नोंदणीकृत स्पर्धकांनी टी-शर्ट व चेस नंबर दि. ०७ मार्च रोजी यशवंत स्टेडियम येथुन दुपारी ४ ते ७ या वेळेत प्राप्त करून देण्यात येणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.