spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर येथे जेष्ठ नागरिकांसाठी ध्यान शिबिराचे आयोजन

नागपूर :- जय तुळजाई ग्रामीण जेष्ठ नागरिकांसाठी ध्यान शिबिराचे आयोजन जय तुळजाई बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्था उमरसरा, जि.यवतमाळ व राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान नवी दिल्ली यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब सांस्कृतिक सभागृह, उर्वेला कॉलोनी नागपूर येथे 20 सप्टेंबर रोजी, जेष्ठ नागरिकांसाठी ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या कर्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अंजली गवारले संचालिका पाइल्स हॉस्पिटल यवतमाळ डॉ. अंजली गवारले यांनी आपल्या भाषणात बोलतांना सांगितले की, ध्यान म्हणजे मनाला एकाग्र करून शांत करण्याची एक प्रक्रिया आहे. ध्यान केल्याने शारीरिक आणि मानसिक ताण कमी होते. त्यामुळे आराम मिळतो. यावेळी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक व महिलांनी सहभाग घेतला होता. संस्थेचे अध्यक्ष पवन धुरट संस्थेचे सचिव वनिता गणपत हाडके, उषा प्रमोद खटे, सुनिता सूर्यवंशी हर्षा, यमतकर व इतर उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.