spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा पोलिस स्टेशनमध्ये आगामी सणानिमित्त निमीत्त बैठक

खापा, वार्ताहर :- पोलिस स्टेशन खापा अंतर्गत बुधवार दि.१८ रोजी ठाणेदार किशोर भुजाडे मार्गदर्शनात रमजान ईद, भव्य हिंदू सम्मेलन, गुडी पाडवा, राम नवमी, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर मस्जिद कमिटी, समता सांस्कृतिक मंडळ, शांतता समिती व दक्षता समितीची बैठक घेण्यात आली.

यावेळी शहर व ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारचे धार्मिक विरोधी किंवा गैरकृत्य नये, सोशल माध्यमांवर आक्षेपार्ह प्रसारीत करु नये, सामाजिक व जातीय सलोखा कायम राखावा, असे आवाहन ठाणेदार किशोर भुजाडे यांनी केले. गावागावात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रतिष्ठीत नागरिक, शांतता समिती, दक्षता समिती व पोलिस पाटलांनी जातीने लक्ष ठेवत पोलिसांना सहकार्य करण्याच्या विनंती ठाणेदार किशोर भुजाडे यांनी केली.

बैठकीला खापा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष अफसर शेख, सचिव मकसूद शेख, उपाध्यक्ष सईद कुरेशी, प्यारू शेख, आशिक पठाण, अहफाज कुरेशी, युनुस कुरेशी, नगरसेविका निशा कठौते, नगरसेवक नामदेव गजभिये, इस्माईल (बब्बू ) शेख, प्रशांत पराते, वल्लभ बुरडे, मोनू बुरडे, बबलू कुरेशी, सिराज शेख, आसिफ शेख, मोहतुरे महाराज यांचेसह शहरातील व परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

Popular Articles