Home Latest News देवलापार–पवनी आदिवासी क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 20 जून रोजी गौरव; करिअर मार्गदर्शन महोत्सवाचे...

देवलापार–पवनी आदिवासी क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 20 जून रोजी गौरव; करिअर मार्गदर्शन महोत्सवाचे आयोजन

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> अपलोना गोंडवाना बहुउद्देशीय विकास संस्था&comma; नागपूर च्यावतीने शनिवार&comma; दि&period; 20 जून रोजी दुपारी 12&period;30 वाजता&period; रामटेक तालुक्यातील पवनी येथील &OpenCurlyQuote;अपलोना गोटूल’ येथे &OpenCurlyQuote;प्रतिमा गौरव व भविष्यवेध मार्गदर्शन महोत्सव 2026’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे&period; देवलापार–पवनी या आदिवासी बहुल क्षेत्रातील शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्या बरोबरच त्यांना उच्च शिक्षण&comma; स्पर्धा परीक्षा&comma; विविध करिअर संधी आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन मिळावे&comma; या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे&period; ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक संधींची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले&period; कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपलोना गोंडवाना बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष राजे वासुदेवशहा टेकाम राहणार आहेत&period; प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार माया इवनाते&comma; महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ&period;टी&period;एस&period;भाल &lpar;IPS&rpar;&comma; संस्थेचे सचिव चंदनसिंग उईके&comma; गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हरीश उईके&comma; सेवानिवृत्त प्राध्यापिका प्रा&period; सुमित्रा टेकाम तसेच मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालय&comma; नागपूरचे प्राध्यापक डॉ&period; केशव वाळके उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत&period; या कार्यक्रमाद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे&period; तसेच समाजातील पालक&comma; शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक दिशा मिळणार आहे&period; कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी व आयोजन समितीचे सदस्य परिश्रम घेत असून परिसरातील विद्यार्थी&comma; पालक&comma; शिक्षक व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे&comma; असे आवाहन अपलोना गोंडवाना बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version