कन्हान :- जय शीतला माता मंदिर, मेन रोड, कांद्री-कन्हान च्या वतीने वटपौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, वृक्ष भेट व शुभेच्छा देऊन त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मंदिरात पूजन करून करण्यात आली. डॉ. अनिल मंगतानी यांच्या हस्ते तसेच धर्मराज विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश डुकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. समाजसेवक संजय चौकसे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यामध्ये आनंदी धोटे (९५.६०%), राधिका शहा (९५.२०%), कनक गोस्वामी (९२.४० %), ऋतिका बावनकुळे (९०.४०%), भाग्यश्री दोडके (८९.४०%), ऋतिका छलिया (८९.२०%), राज चंद्रेल (८४.३७%), खुशी शहा (८४.३७%), गोपाल भुरे (९०.२०%), अर्पिता पासवान (९२.८०%), जानवी चोपकर (९२.४०%) आणि खुशी रघटाटे (९२.३३%) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत अधिकाधिक प्रगती करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय चौकसे, महेश मंगतानी, वामन देशमुख, गोकुल पटेल, पारस मरघडे, वसंत राऊत, चंद्रशेखर बावनकु ळे, प्रकाश ठोके, बादल विश्वकर्मा, ओमदास लाडे, नरेश बावने, प्रेमचंद चव्हाण, नितीन शर्मा, राजकुमार यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.




