spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनसेच्या शिष्टमंडळाकडून महापालिका आयुक्तांना निवेदन

– आस्थापने व विविध कंपन्यामध्ये दहापेक्षा जास्त महिला असल्यास समिती स्थापन करावी

नागपूर :- दि.२ जून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने बुधावारी दिनांक २ जून रोजी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन शहरातील विविध नागरी समस्या, रोजगार व स्वयंरोजगाराशी संबंधित प्रश्न तसेच नागरिकांच्या हिताच्या मागण्यांबाबत निवेदन सादर केले.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे राज्य उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे, महिला शहर अध्यक्षा रोशनी खोब्रागडे, विभागाध्यक्ष हर्षद दसरे, विभाग उपाध्यक्ष अभयसिंग राजपूत, व्यापारी सेनेचे विभागाध्यक्ष रामोजी मधुकरराव खोब्रागडे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने शहरातील विविध समस्यांवर चर्चा करून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. अशी मागणी केली. आयुक्तांनी निवेदन स्वीकारून संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी पक्ष सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. बैठकीत विविध सामाजिक, व्यापारी व रोजगारविषयक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

Popular Articles