spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रिआन हाँस्पिटलमध्ये आधुनिक पद्धतीची आरोग्य सेवेचा शुभारंभ

कॅथलॅब, डायलिसिस, आयसीयु व ट्रॉमा सेंटरचे उद्घाटन

सचिन चौरसिया, २८ रामटेक :– जनसामान्यांच्या उत्तम आरोग्य सेवेसाठी रिआन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, रामटेक येथे सुसज्ज कॅथलॅब, हिमो डायलिसिस, आयसीयु, एनआयसीयु आणि ट्रॉमा सेंटरचे शनिवार (दि.२६) ला  राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना, “रिआन हॉस्पिटल सुरू झाल्यापासून अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात तालुक्याच्या ठिकाणी विशेषत्वाने ग्रामीण भागातील लोकांना कॅथलॅब व हिमो डायलिसिसच्या उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते.  रिआन हॉस्पिटल मधील कॅथलॅब व हिमो डायलिसिस सेंटर हे महाराष्ट्रात ग्रामीण भागातील पहिले सेंटर असून परिसरातील जनसामान्यांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध  होणार ही गौरवाची बाब आहे.” असे मत व्यक्त करत मंत्री जयस्वाल यांनी डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या संपूर्ण टीमचे उत्कृष्ट आरोग्य सेवेसाठी अभिनंदन केले. याप्रसंगी कार्यक्रमाला रिआन हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप बोरकर, डॉ. वैशाली बोरकर, ॲड. प्रफुल अंबादे, डॉ. संजय वाघमारे (वैद्यकीय अधीक्षक, एसडीएच, रामटेक), डॉ. व्यंकटेश रेवाळे, संजय नानोटकर, डॉ. प्रवीण बैस, डॉ.गुंजन कोल्हे, डॉ. गणेश बावनथडे, डॉ. ओंकार चौधरी, डॉ. अंकुर चौधरी, दीनदयाल बोरकर, सुमनताई बोरकर, नंदाताई डोंगरे संदीप बोरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आकाशझेपचे सचिव साक्षोधन कडबे यांनी केले तर शुभांगी डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.एम.ओ. डॉ. आशिष सांगोडे, डॉ. वर्षा गजभिये, डॉ. श्वेता मोहोड, डॉ. वसीम पठाण, दुलेश जगने, मयंक मेश्राम आणि समस्त कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले

Popular Articles