कामठी २८ : महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी कामठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांची गोंदिया नगरपरिषद येथे मुख्यअधिकारी पदी बदली केली असून त्यांच्या रिक्त जागेवर नागपूर महानगरपालिकेचे परिवहन व्यवस्थापक विनोद जाधव यांची नियुक्ती केल्याचे आदेश जारी केले असुन विनोद जाधव यांनी कामठी नगर परिषदेच्या मुख्यअधिकारी पदाचे पदभार स्वीकारले असून कामठी शहरातील घाण -अस्वच्छता व विविध विकास कामे प्राथमिकतेणे सोडविणार असल्याचे सांगितले.








