कावड यात्रेने कामठी शहर दुमदुमले
नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले
कामठी २८ : कन्हान नदीच्या तीरावर वसलेल्या जुनी कामठी येतील कामठेश्वर मंदिरात कावड यात्रेने जल अभिषेक करून श्रवण मासाची सुरुवात करण्यात आली श्री क्षेत्र महादेव घाट कन्हान नदी येथे पंडित विजेंद्र शास्त्री यांच्या हस्ते पूजा, आरती करून कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली बँड, डीजे, ढोल, ताशे, फटाके, भजन मंडळाच्या उपस्थितीत निघालेली शोभायात्रा मेन रोड, भाजी मंडी, शीतला माता मंदिर, बोरकर चौक, लाला ओली, अग्रवाल भवन, सत्यनारायण चौक, पोरवाल चौक, गांधी चौक, गोयल टॉकीज चौक, जयस्तंभ चौक, गवळीपुरा, लकडगंज, गंज बालाजी मंदिर, पोलीस लाईन, नया गोदाम ,गरुड चौक ,गोरा बजार चौक ,पुराणा गदाम चौक नगर ब्राह्मण करीत जुनी कामठी कामठेश्वर मंदिरात कावड यात्त्रेने आणलेल्या जला जलाद्वारे अभिषेक करून श्रावण मासाला सुरुवात करण्यात आली कावळयात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण करण्यात आले शोभायात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जुनी कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, वाहतूक पोलीस निरीक्षक सुनंदा देशमुख, नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आधीळे यांचेमार्गदर्शनात पोलिसांचा कडक पोळीबंदोबस्त लावण्यात आला.




