Home Latest News मोर्शी तालुका कृषी अधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित करा ! 

मोर्शी तालुका कृषी अधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित करा ! 

0

<p><strong>&&num;8211&semi; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उप विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन &excl; <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; रुपेश वाळके यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा &excl; <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मोर्शी तालुका प्रतिनिधी &colon;-<&sol;strong> मोर्शी तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे सध्या मोर्शी–चांदूर बाजार मार्गावरील येरला फार्म परिसरात&comma; शहरापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर कार्यरत आहे&period; त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून हे कार्यालय तात्काळ मोर्शी शहरातील नवीन तालुका प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित करावे&comma; अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र पवार तसेच कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी आगरकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करून केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पूर्वी मोर्शी तालुका कृषी कार्यालय बसस्थानकाजवळील मनोरमा कॉम्प्लेक्स येथे असल्याने शेतकऱ्यांना सहजपणे आपली कामे करता येत होती&period; मात्र सुमारे आठ वर्षांपूर्वी कृषी विभागाने हे कार्यालय शहराबाहेर हलविले&period; सध्या कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही सोयीस्कर वाहतूक व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना एका फेरीसाठी जवळपास शंभर रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच कार्यालय परिसरात स्वच्छ पिण्याचे पाणी&comma; स्थिर वीजपुरवठा आणि मोबाईल नेटवर्क यासारख्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत&period; त्यामुळे शेतकरी आणि कर्मचारी दोघांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे&period; बहुसंख्य महिला कर्मचारी येथे कार्यरत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मोर्शी शहरातील इतर सर्व शासकीय कार्यालये अमरावती–वरूड मुख्य मार्गावरील नवीन तालुका प्रशासकीय इमारतीमध्ये किंवा शहरातच कार्यरत असताना तालुका कृषी अधिकारी कार्यालय मात्र अजूनही शहराबाहेर का ठेवले आहे&comma; असा संतप्त सवालही रुपेश वाळके यांनी उपस्थित केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सोयीचा विचार करून मोर्शी तालुका कृषी अधिकारी कार्यालय तात्काळ शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित करावे&comma; अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल&comma; असा इशाराही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी प्रशासनाला दिला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश घारड&period; तालुका अध्यक्ष रुपेश वाळके&comma; धनंजय अमदरे&comma; राजेश ठाकरे&comma; गजानन वानखडे&comma; कांचन कुकडे&comma; मनीष गुडधे&comma; हितेश साबळे&comma; अक्षय ढोमणे&comma; अभिजित सावरकर यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version