Home Latest News आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एडुसन फाऊंडेशन तर्फे उद्योजकता जनजागृती कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एडुसन फाऊंडेशन तर्फे उद्योजकता जनजागृती कार्यक्रम

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> दिनांक ११ मार्च २०२६ रोजी नवीन सुभेदार येथील एडुसन फाऊंडेशन येथे&comma; आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत एडुसन फाऊंडेशन तर्फे उद्यमी महिलांसाठी उद्योजकता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले&period; महिला सशक्तीकरण व महिलांना आत्मनिर्भर बनविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता&period; या शिबिरास अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमाचे आयोजन एडुसन फाऊंडेशन व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले&period; कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून MCED येथील जिल्हा प्रकल्प अधिकारी करुणा शेंडे उपस्थित होत्या&period; त्यांनी महिलांना शासनाच्या विविध योजनांअंतर्गत उद्योग विकासासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा&comma; बँकमार्फत मिळणारे सुलभ कर्ज तसेच विभागामार्फत आयोजित EDP कार्यशाळांविषयी माहिती दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी एडुसन फाऊंडेशनचे संचालक निलेश काळे यांनीही उद्यमी महिलांना मार्गदर्शन केले&period; महिलांच्या उद्योगविकासाशी संबंधित प्रश्न संस्थेच्या माध्यमातून सोडविण्यात येतील व आवश्यक ते सहकार्य केले जाईल असेही त्यांनी सांगितले&period; या कार्यक्रमाला एडुसन फाऊंडेशन महिला सशक्तीकरण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version