Home Latest News महापौर निता ठाकरे यांनी केली ‘सोनचिरैया’ उपजीविका केंद्राची पाहणी

महापौर निता ठाकरे यांनी केली ‘सोनचिरैया’ उपजीविका केंद्राची पाहणी

0

<p><strong>&&num;8211&semi; महिलांना रोजगार&comma; प्रशिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी मिळेल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>शहरातील सीताबर्डी येथील दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कार्यरत असलेल्या &OpenCurlyQuote;सोनचिरैया’ शहरी उपजीविका केंद्र&comma; स्टिचिंग क्लस्टर आणि प्रशिक्षण केंद्राला महापौर निता ठाकरे यांनी बुधवारी &lpar;ता&period; ११&rpar; भेट देत पाहणी केली&period; यावेळी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी&period;&comma; समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ&period; रंजना लाडे&comma; समाज विकास विभागाचे विनय त्रिकोलवार&comma; विनीत टेंभूर्णे&comma; आरोह संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मिष्ठा गांधी यांच्यासह बचत गटातील महिला उपस्थित होत्या&period;<&sol;p>&NewLine;<p>केंद्रामध्ये उभारण्यात आलेल्या शॉपिंग मॉलमध्ये नागपूर जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे&period; या केंद्राच्या माध्यमातून स्वयंसहायता समूहातील महिलांना रोजगार&comma; प्रशिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन  महापौर निता ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-36904 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;03&sol;WhatsAppImage2026-03-11at3&period;47&period;19PM2&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>महापौर निता ठाकरे यांनी स्टिचिंग क्लस्टर आणि प्रशिक्षण केंद्रातील महिलांची संवाद साधला व मार्गदर्शन केले&period; यावेळी बोलताना महापौर निता ठाकरे यांनी उपजीविका केंद्रातील विविध वस्तू उत्तम&comma; टिकाऊ आणि सुंदर असल्याचे सांगत&comma; नागरिकांना या सर्व वस्तू माफक दरात उपलब्ध व्हाव्यात&comma; तसेच या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी&comma; हा याचा मूळ उद्देश असल्याचेही महापौर निता ठाकरे यांनी सांगितले&period; केंद्रातील महिला कशा काम करतात हे त्यांनी यावेळी जाणून घेतले&period; वस्तूंची गुणवत्ता&comma; दर्जा व किंमत योग्य असावी&comma; बाजारातील इतर वस्तूंच्या तुलनेत आपल्या वस्तू अधिक चांगल्या असाव्यात&comma; तसेच नागरिकांनी अधिकाधिक संख्येत केंद्राला भेट द्यावी व सहकार्य करावे&comma; असे आवाहनही महापौरांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>सीताबर्डी येथील सोनचिरैया या उपजीविका केंद्रात &lpar;शॉपिंग मॉल&rpar; विविध स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू जसे चिवडा-चकली&comma; पापड&comma; शेवया&comma; लोणचे&comma; मसाले असे उत्तमरीतीने व स्वच्छता बाळगून तयार केलेले खाद्यपदार्थाचे प्रकार&comma; घर सुशोभीकरणाच्या वस्तू जसे मॅट&comma; वॉल हँगिंग&comma; रांगोळ्या&comma; पेन्टिग&comma; कंदील&comma; दिवे आदी वस्तू&comma; महिलांकरिता आकर्षक असे लुगडी-पातळ&comma; ड्रेस माफक दरात उपलब्ध आहे व तसेच शिवून देखील मिळेल&period; देव-पूजेला लागणारे साहित्य&comma; तसेच बाग-बगिच्यात कामाकरिता विविध प्रकारचे खत अशा अनेक उपयोगी वस्तू उपलब्ध आहेत&period;<img class&equals;"alignnone wp-image-36905 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;03&sol;WhatsAppImage2026-03-11at3&period;47&period;19PM1&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>याठिकाणी महिलांसाठी स्टिचिंग क्लस्टर कार्यरत असून त्याद्वारे महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात येते&period; या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनण्याची आणि स्वतःचा छोटा व्यवसाय उभा करण्याची संधी उपलब्ध होत आहे&period; घराची जबाबदारी सांभाळत महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे&comma; त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा हा नागपूर महानगरपालिकेच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे&period; या केंद्राच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना आपल्या कौशल्याला वाव मिळत असून त्या स्वबळावर कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी योगदान देत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>स्टिचिंग क्लस्टरच्या माधमातून आजवर ६८ महिलांनी स्टिचिंग क्लस्टरचे प्रशिक्षण घेतले असून&comma; यातील ३५ महिला केंद्रात कार्यरत आहेत व २२ महिला घरून काम करीत आहेत&period; प्रशिक्षण प्राप्त महिलांना विविध खाजगी व व्यवसायिक संस्थांकडून कार्य मिळत आहे&period; याआधारावर त्यांना ४ ते ५ हजार रुपयांचे मानधन प्राप्त होत आहे&period; तसेच त्यांना मनपाद्वारे विविध कार्य प्रदान करण्याचे प्रयत्न सुरू असून&comma; त्यानुषंगाने त्यांच्या मानधनात वाढ होत आहे&period; प्रायमरी सिलाई मशीन&comma; आधुनिक सिलाई मशीन&comma; होल बटण&comma; काच बटण अशा अत्याधुनिक मशीन कामाचे प्रशिक्षण देल्या जात आहे&period;  à¤®à¤¹à¤¾à¤ªà¥Œà¤° यांनी महिलांना कपड्याचे कटिंग काम करून कामात कुशल बनविण्यासाठी कार्य करण्याच्या सूचना दिल्या&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version