नागपूर :- मोरया फाउंडेशनच्या वतीने समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने शनिवार, दि. १८ जुलै ला दुपारी १२ वाजता. अमरनगर समाज भवन येथे, हनुमान मंदिर, चिखलीचा राजा रोड येथील भव्य ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोहन मते उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. समाजातील ज्येष्ठांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मंगलाताई खेकरे (सभापती, परिवहन समिती, नागपूर महानगर), बाबाराव तायडे (नगरसेवक, प्रभाग ३४), सूरज गोजे (शिवसेना जिल्हाप्रमुख व मनोनीत नगरसेवक), मुकेशभाऊ रेवतकर (अध्यक्ष, दक्षिण नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) तसेच अर्पणा सुनील मानेकर (मानिनी सखी मंच) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका व सचिव रजनी अविनाश चौहान यांनी केले असून, या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
मोरया फाउंडेशनतर्फे भव्य ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा व नृत्य स्पर्धेचे आयोजन आज









