spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भिलगावात आई तुळजाभवानी दसरा समितीचा दसरा उत्सव उत्साहात

– भव्य शोभायात्रेत प्रभू श्रीराम व श्री महाकालीचे देखावे ठरले आकर्षण; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

कामठी :- कामठी तालुक्यातील भिलगाव परिसरात आई तुळजाभवानी दसरा समितीच्या वतीने मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीचा उत्सव उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रा, धार्मिक देखावे आणि विविध मंडळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला विशेष रंगत आणली. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

विजयादशमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत प्रभू श्रीराम आणि श्री महाकाली यांच्या आकर्षक देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक उत्साहात सहभागी झालेल्या नागरिकांनी शोभायात्रेला प्रतिसाद दिला. विविध मंडळांच्या सांस्कृतिक सादरीकरणामुळे उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक झाले.

या उत्सवासाठी महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन लाभले.

उत्सवाच्या नियोजनात समितीचे मार्गदर्शक मनोज जीभकाटे, रणाळा ग्रा प सरपंच पंकज साबळे, शालिक वंजारी, निखिल फलके, शेखर वंजारी आणि राहुल भुजाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर आयोजक शुभम बेलखोडे, हर्षल जीभकाटे, अभिजीत लांबट, अमित कुंभारे, सूरज जिभकाटे आणि भूषण लांबट यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला मुकुंदराव जीभकाटे, कवठा येथील सरपंच निलेश डफरे, भिलगाव ग्रामपंचायत सदस्य गुणवंत माकडे, धनंजय इंगोले, खोजेंद्र माकडे, भास्कर भणारे, नितेश भणारे तसेच श्रीरामसेनेचे पदाधिकारी आणि परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.

Popular Articles