spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाद्वारे रस्ता डांबरीकरण कार्याला वेग

– हॉट मिक्स प्लांट विभागाद्वारे चार झोनमधील कार्य पूर्ण

नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासह शहर सौंदर्यासाठी नागपूर महानगरपालिका विशेष प्रयत्नशील आहे. नागपूर महानगरपालिकेच्या हॉटमिक्स प्लांट विभागामार्फत शहरातील विविध भागांतील ५३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, कार्याला अधिक वेग आला आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत हे कार्य पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सध्या हॉट मिक्स प्लांट विभागाद्वारे चार झोनमध्ये १० कि.मी रस्त्याचे कामे पूर्ण झाले आहे. मनपाद्वारे डांबरीकरणाचे काम काम होत असल्याने नागपुरांकडून समाधान व्यक्त होत आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व मुख्य अभियंता मनोज तालेवार यांच्या संमतीने आधुनिक झालेल्या हॉटमिक्स प्लांटद्वारे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने खराब रस्त्याच्या डांबरीकरणाचे कार्य केल्या जात आहे. नागपूर महानगरपालिका हॉट मिक्स प्लांट विभागाने नागपूर शहर वाहतूक पोलिस शाखेशी समन्वय साधून कार्यवाही सुरू केली आहे. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जात असल्याने नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. विशेष म्हणजे, डांबरीकरण केल्या जात असलेल्या मार्गावर नागरिकांना त्रास होई नये याकरिता उपद्रव शोध पथकाचे जवान तैनात करण्यात आले आहे.

मनपाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकूण ५३ किलोमीटरच्या मार्गाची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार, मनपाच्या दहाही झोनमध्ये काम करण्यात येत आहे. हॉट मिक्स प्लांटतर्फे आजवर धरमपेठ झोन, धंतोली झोन, हनुमान नगर झोन व गांधीबाग झोन मधील सुमारे १० किमी. लांबीची एकूण ५१ लहान मोठे रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

धरमपेठ झोन येथील प्रभाग १५ मधील रामदास पेठेतील वंदना अपार्टमेंट ते कल्पना अपार्टमेंट, धंतोली परीरसरातील छोटी धंतोली उद्यान परिसर, प्रभाग १३ मधील रामनगर ते पांढराबोडीपर्यंत खराब रस्त्याचे डांबरीकरणाचे कामे पूर्ण करून रस्ते चकचकीत करण्यात आले आहे. धंतोली झोन येथील प्रभाग ३५ मधील नवनाथ सोसायटी, आरटीओ सोसायटी, महालक्ष्मी सोसायटी मधील डांबीरकणाचे कामे पूर्ण झाली आहे. याचबरोबर भारतीय गृह निर्माण, पॉपूलर सोसायटी/मंगलम सोसायटी मधील रस्त्यांचे डांबरीकरणाची कामे पूर्ण झाली आहे. शिवाय शिल्पा सोसायटी, शनी मंदिर परिसरातील डांबरीकरणाचे कामे पूर्ण करण्यात आली आहे.

हनुमाननगर झोन येथील प्रभाग ३१ मधील स्नेहश्री अपार्टमेंट ते श्रीराम प्लाजापर्यंत खराब रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाली आहे. याचबरोबर गणेश मंदीर ते नागोबा मंदीरपर्यंत, समाग अपार्टमेंट ते श्रीराम संकुल मनपा शाळापर्यंत, समाग अपार्टमेंट ते बुते यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरणाचे कामे पूर्ण करण्यात आली आहे. याशिवाय प्रणय जनरल स्टोर ते प्रदीप किराणापर्यंत, माता मंदिर ते प्रणय जनरल स्टोअर्स पर्यंत, हकिम हार्डवेअर ते माकोडे मटन शॉपपर्यंत रस्त्यावर डांबरीकरणाचे कामे पूर्ण करण्यात आली आहे.

याचबरोबर तथागत बुद्धविहार रोड, आनंद पब्लिक स्कूल ते श्री किराणापर्यंत, धरम तांबे यांच्या घरापासून ते मदनलाल चांडक यांच्या घरापर्यंत रामटेके यांच्या घरापासून ते राजेंद्र जेठे यांच्या घरापर्यंत, अजय राठी यांच्या घरापासून ते धरम तांबे यांच्या घरापर्यंतपर्यंत,  गांधी यांच्या घरापासून ते चंद्र कुसुम यांच्या घरापर्यंत, गांधी यांच्या घरापासून ते सोहन शेंडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरणाचे कामे पूर्ण करण्यात आले आहे. गांधीबाग झोन येथील प्रभाग २२ मधील गंगाबाई घाट ते कुंभार टोली चौकपर्यंत या सहा पदरी डीपी रोडचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाली आहे. प्रभाग ८ मधील विश्वकर्मा ते मेयो हॉस्पीटल मेट्रो स्टेशन, मोमीनपूरापर्यंत रस्त्यावरील डांबरीकरणाचे कामे सुरु असून उर्वरीत कामे ३१ डिसेंबर पर्यत पूर्ण करण्याकरीता हॉट मिक्स विभागातर्फे दररोज सुमारे ३०० मेट्रिक टन डांबराचे उत्पादन करून २० ते २२ लोडनी रस्ते दुरुस्तीची काम करण्यात येत आहे, अशी माहिती हॉट मिक्स प्लान्ट विभागाचे कार्यकारी अभियंता, अजय डहाके यांनी दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.