spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धंतोली परिसरातील वाहतूकीस अडथळा निर्माण होणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण महापालिकेची व पोलीस विभागाची धडक कारवाई

नागपूर :- महानगरपालिकेच्या धरमपेठ झोन तसेच लक्ष्मीनगर झोन अंतर्गत धंतोली परिसरातील वाहतूकीस निर्माण होणाऱ्या रस्त्यावरील अळथळे निर्माण करणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे करणाऱ्यांविरुद्ध दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या प्रमाणात संयुक्त अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई आयुक्त, नागपूर महानगरपालिका, पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान धंतोली परिसरातील रस्ते, दवाखाने व रुग्णालयांच्या आजूबाजूचा रस्ते मोकळे करून परिसर मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले आहे.

महानगरपालिकेच्या वतीने नागरिक, व्यावसायिक, दुकानदार तसेच आस्थापना चालकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या परिसरात रस्त्यावर अथवा सार्वजनिक रस्त्याच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये.

यापुढे रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण आढळून आल्यास संबंधितांचे साहित्य जप्त करून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच लागू असलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाहीदेखील करण्यात येईल.

धंतोली परिसरातील रस्ते व सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी ही कारवाई निरंतर सुरू राहणार असून नागरिकांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन, सहा. आयुक्त, धरमपेठ झोन व लक्ष्मीनगर झोन यांच्या वतीने करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.