spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अनुयायांना सेवा पुरविण्यासाठी मनपा कटिबद्ध

– दीक्षाभूमी परिसरात नियंत्रण कक्षाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर :- ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या कार्यक्रमाला नागपुरात येणाऱ्या लाखो अनुयायांना आवश्यक नागरी सुविधा पुरविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे पूर्ण प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी आलेल्या अनुयायांना नागरी सुविधांची माहिती देण्यासाठी दीक्षाभूमी परिसरात महानगरपालिकेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ उभारलेल्या नियंत्रण कक्षाचे मंगळवारी (ता:३०) डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन (ता. ३०) करण्यात आले. यावेळी दीक्षाभूमी परिसरात महानगरपालिकेने पुरविलेल्या नागरी सुविधांची माहिती संकलित केलेल्या व्यवस्थापन माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सुद्धा आयुक्त डॉ. चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, वैष्णवी बी, मुख्य अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बारहाते, उपद्रव शोध पथकाचे पथक प्रमुख वीरसेन तांबे, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, राजेश दुफारे, श्रीकांत वाईकर, राजेंद्र राठोड यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. हा नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहणार आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा हा नागपूरचा एक अभिमानाचा व गौरवाचा भाग असल्याचे सांगून डॉ. चौधरी यांनी राज्यातून व परराज्यातून येणाऱ्या धम्म बांधवांना चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्यांना नागरी सुविधा देण्यासाठी सर्व व्यवस्था महानगरपालिका प्रशासनाने केली आहे. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या या अनुयायांना नागरी सुविधा पुरविणे हे एक आव्हान आहे. पुढील तीन दिवस महानगरपालिकेचे अधिकारी व सर्व कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. परंतु, अनुयायांच्या अडचणी दूर करण्याची जबाबादीर आपली आहे. या भावनेने सर्व कर्मचाऱ्यांनी काम करावे व या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहून आपल्या गावी जाणाऱ्या अनुयायांच्या मनात नागपूरची एक चांगली प्रतिमा निर्माण झाली पाहिजे, यासाठी आपण सर्व काही दिवस प्रयत्न करू या, असे आवाहन त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी केले.

प्रारंभी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी केले. तर अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांचे स्वागत कार्यकारी अभियंता रविंद्र बुंधाडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले.

अशी आहे व्यवस्थापन माहिती पुस्तिका

नागपूर महानगरपालिकेने ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येणाऱ्या अनुयांना माहिती देण्यासाठी नागरी सुविधांची संपूर्ण माहिती देण्यासाठी ५१ पानांची व्यवस्थापन माहिती पुस्तिका २०२५ प्रसिद्ध केली आहे. या पुस्तिकेमध्ये नियंत्रण कक्षातील जबाबदारी अधिकारी व त्यांचे दूरध्वनी क्रमांक नमूद केले आहे. .याशिवाय घनकचरा व्यवस्थापन, पाण्याची व्यवस्था, शौचालय बांधकाम व मंडप उभारणी व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, परिवहन व्यवस्थापन, वैद्यकीय आरोग्य व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापनाची माहिती व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक नमूद केलेले आहेत.

Popular Articles