– पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त मनपाचे विशेष अभियान
नागपूर :- पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ५ ते २१ जून या कालावधीत संपूर्ण शहरात ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून, मनपातर्फे आज (ता. 11) शहरातील विविध बाजारपेठ, व्यावसायिक संकुल, मॉल्स व भाजी मंडी परिसरात स्वच्छता करण्यात आली. तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट व कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, त्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेता संजय महाकाळकर, एमआयएम गटनेता शकील पटेल, मुस्लीम लीगचे गटनेता अस्लम मुल्ला खान, शिवसेनेचे गटनेता गणेश चर्लेवार यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध भागात साफसफाई मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सफाई कर्मचारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.
शहरातील सर्व झोनमधील बाजारपेठ, व्यावसायिक संकुल, मॉल्स व मंडई परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत आशीनगर झोनमध्ये झोन सभापती आसिफ शेख, लक्ष्मीनगरमध्ये नगरसेवक अमोल शामकुळे, धंतोली झोनमध्ये नगरसेविका सुजाता कोंबाडे, आशीनगर झोनमध्ये नगरसेवक सुहास नानवटकर, नगरसेवक अभिषेक शंभरकर, नगरसेविका कल्पना द्रोणकर मंगळवारी झोनमध्ये नगरसेवक प्रमिला माथराणी यांच्यासह संबंधित प्रभागातील नगरसेवक व झोन अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी झोनचे सहाय्यक आयुक्त, झोनल स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. या उपक्रमात खामला मार्केट, बुधवार बाजार, महात्मा फुले मार्केट, इतवारी मार्केट, सक्करदरा मार्केट, कमाल मार्केट बाजार, जरीपटका मार्केट या शहरातील प्रमुख बाजारपेठ व परिसराची स्वच्छता प्रामुख्याने करण्यात आली.

खामला मार्केट
लक्ष्मीनगर झोनमध्ये ‘विशेष स्वच्छता अभियानांतर्गत बाजारपेठ, व्यावसायिक संकुल, मॉल्स व मंडई परिसरात स्वच्छता करण्यात आली. महापौर निता ठाकरे आणि स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी खामला मार्केट परिसरात भेट दिली. यात महापौर निता ठाकरे, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी सहभाग घेतला व व्यापार्यांशी संवाद साधला. अधिकाधिक कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी केले.
यावेळी व्यापारी संघटनचे अध्यक्ष मोहन चावला, सचिव विनोद जेठानी, व्यापारी आघाडीच्या श्रुती देशपांडे, श्रीकांत भोरे, विनोद चावला, पंकज वर्धानी, उदय माहुरे, झोन स्वच्छता अधिकारी ऋषीकेश इंगळे, स्वास्थ्य निरीक्षक डी. एस. गजभिये उपस्थित होते.
गोकुळपेठ मार्केट- नेताजी मार्केट
धरमपेठ झोनमधील गोकुळपेठ व नेताजी मार्केटमध्ये सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, झोनल स्वच्छता अधिकारी लोकेश बासनवार, स्वच्छता निरीक्षक जयवंत जाधव, मनपाचे ब्रॅड ॲम्बसेडर व तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंदडा, तसेच सदस्य यांच्यासह मनपाचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
बुधवार बाजार, सक्करदरा
हनुमाननगर झोनमधील सक्करदरा परिसरातील बुधवार बाजारात साफसफाईचे अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, झोनल स्वच्छता अधिकारी दिनेश कलोडे, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, शितल चौधरी, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, पिनाकी बनिक, प्रतिक इसमपल्लीवार, यांच्यासह गांधी मार्केटचे अध्यक्ष नाना गिरड, राजेश काळे, एनडीएस पथक यांच्यासह संबधित प्रभागातील नगरसेवक मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
महात्मा फुले कॉटन मार्केट
धंतोली झोनमधील कॉटन मार्केट परिसरातील महात्मा फुले भाजी मंडीमध्ये साफसफाईची मोहिम राबविण्यात आली. नगरसेविका सुजाता कोंबाडे, नगरसेवक सुहास नानवटकर, झोनल स्वच्छता अधिकारी राजेश गायधनी यांच्यासह संबधित प्रभागातील नगरसेवक, मनपाचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग घेतला.

महाल मार्केट, गांधीबाग कपडा बाजार, संत्रा मार्केट
गांधीबाग झोनमधील महाल मार्केट, गांधीबाग कापड बाजार व संत्रा मार्केट परिसरात साफसफाईची मोहिम राबविण्यात आली. यात व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी सुद्धा सहभाग घेतला. यावेळी सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, झोनल स्वच्छता अधिकारी सुरेश खरे, मनपाचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
आशीनगर झोन-कमाल मार्केट
आशीनगर झोनमधील कमाल मार्केट परिसरात या मोहिमेअंतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी झोन सभापती आसिफ शेख, नगरसेवक अभिषेक शंभरकर, नगरसेविका कल्पना द्रोणकर, झोनल स्वच्छता अधिकारी भोला खोब्रागडे, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, यांच्यासह संबधित प्रभागातील नगरसेवक, मनपाचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
मंगळवारी झोन- जरीपटका मार्केट
मंगळवारी झोनमधील बाजार पेठ व व्यावसायिक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यात मोहिमेत नगरसेविका प्रमिला माथरानी यांच्यासह अनेकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. संबधित प्रभागातील नगरसेवक, मनपाचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक यांनी जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
आज दहनघाट व कब्रस्तानची सफाई
नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर, स्वस्थ आणि हरित स्वरूप देण्याच्या दिशेने पाऊल टाकत पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त विशेष स्वच्छता अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे शुक्रवारी(ता.१२) शहरातील दहाही झोन निहाय दहनघाट आणि परिसराची सखोल स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे.
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत सहकारनगर घाट, जयताळा घाट, धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या अंबाझरी घाट, फ्रेंड कॉलोनी घाट, हनुमाननगर झोन अंतर्गत येणाऱ्या नरसाळा दहन घाट, मानेवाडा घाट, सोफिया कब्रस्तान, धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या मोक्षधाम घाट, चिंचभवन घाट, नेहरुनगर झोन अंतर्गत येणाऱ्या वाठोडा घाट, दिघोरी घाट, ताजबाग कब्रस्तान, गांधीबाग झोन अंतर्गत गंगाबाई घाट, मोमिनपुरा कब्रस्तान, सतरंजीपुरा झोन अंतर्गत शांतीनगर घाट, बोहरा कब्रस्तान, लकडगंज झोन अंतर्गत कळमना घाट, भरतवाडा घाट,पारडी घाट, पुनापुर घाट, आशीनगर झोन वैशाली नगर घाट,नारी घाट, हमीद नगर मुस्लिम कब्रस्तान, मंगळवारी झोन अंतर्गत नारा घाट, मानकापूर घाट, ख्रिश्चन कब्रस्तान, मुस्लिम कब्रस्तान येथे सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.







