spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

छठ पूजा उत्सवासाठी मनपा सज्ज

– अंबाझारी, फुटाळा, पोलिस लाईन टाकळी, गोरेवाडा येथे विशेष सोय

नागपूर :- उत्तर भारतीयांचा धार्मिक उत्सव असणाऱ्या छठ पूजाला विशेष महत्त्व असून, यानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अंबाझरी तलाव आणि फुटाळा तलाव, पोलिस लाईन टाकळी, गोरेवाडा येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी सोमवारी (ता.27) मनपाद्वारे फुटाळा तलाव येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांच्या देखरेखीखाली छठ पूजा करीता मनपातर्फे भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे.

उत्तर भारतीयांचा धार्मिक उत्सव छठ पूजा नागपुरात हर्षोल्हासात साजरा केला जातो. येथे येणाऱ्या भाविकांसाठी मनपातर्फे अंबाझरी तलाव आणि फुटाळा तलाव, पोलिस लाईन टाकळी, गोरेवाडा येथे सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. यात प्रामुख्याने अंबाझरी तलाव येथे होणाऱ्या छठ पूजानिमित्त परिसराची साफसफाई वर विशेष लक्ष दिले जात आहे. भाविकांना तलावापर्यंत येण्यासाठी मार्ग सुशोभित करून सुरक्षेसाठी कठडे लावण्यात आले आहेत. याशिवाय विद्युत व्यवस्था, बर्रीकॅडींग, साऊंड व्यवस्था, पेयजल लावण्यात आली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पूजा स्थळी उभे राहण्यासाठी स्टॅंड उभारण्यात आले असून, सुरक्षा व्यवस्था तसेच तलावाच्या काठावर कपडे बदलण्याची तात्पुरत्यास्वरुपात खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय परिसराची स्वच्छता करण्यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षणाच्यादृष्टीने निर्माल्य तलावात टाकू नये, यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

Popular Articles