spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपाचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी स्वीकारला पदभार

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून संजय महाकाळकर यांनी सोमवारी (ता.०९) पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे आमदार व नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी, शिवसेना (उबाठा) गटनेते किशोर कुमेरीया यांच्यासह काँग्रेसचे अनेक नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी संजय महाकाळकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी  नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारला. आमदार  विकास ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे नेते किशोर कुमेरीया यांनी पुष्पगुच्छ देऊन महाकाळकर यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे आमदार अभिजीत वंजारी, नगरसेविका  सुजाता कोंबाडे, नगरसेविका सलामे, प्रमोद ठाकूर,  अभिजीत झा, योगेश तिवारी, काँग्रेसचे नेते उमाकांत अग्निहोत्री, संजय दुबे, गिरीश पांडव, अतुल कोटेचा,  विशाल मुत्तेमवार, आकाश तायवाडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Popular Articles