नागपूर :- भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी.यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन आदरांजली अर्पण केली.

याप्रसंगी मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम, निर्भय जैन, मेघना वासनकर, मंगेश खवले,मुख्य लेखापरीक्षक किरण तायडे, सहायक आयुक्त श्याम कापसे, घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, प्रमोद हिवसे, जितेश धकाते, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना “राष्ट्रीय एकात्मतेची शपथ” दिली.
तत्पूर्वी राजे रघुजीराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच थोर पराक्रमी वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त पुतळयाला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी मनपाच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.




