Home Latest News मनपा विद्यार्थ्यांचे कलागुण आकाशवाणीवर

मनपा विद्यार्थ्यांचे कलागुण आकाशवाणीवर

0

<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या पी&period; एम&period; श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय &lpar;मनपा शाळा&rpar; येथील नर्सरी ते चौथीपर्यंतच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी &OpenCurlyQuote;आकाशवाणी’वर झेप घेत&comma; आपली कला आणि सर्जनशीलता संपूर्ण जिल्ह्यासमोर सादर केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रत्येक रविवारी आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या &OpenCurlyQuote;बालसभा’ या लोकप्रिय कार्यक्रमात या विद्यार्थ्यांनी गाणी&comma; गोष्टी&comma; बोधकथा&comma; नाटिका तसेच स्वच्छतेचा संदेश यांचे मनमोहक सादरीकरण केले&period; या कार्यक्रमाचे एकूण चार भागांमध्ये रेकॉर्डिंग करण्यात आले असून&comma; पहिला भाग आधीच प्रसारित झाला आहे&period; तर दुसरा भाग रविवार&comma; दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८&period;४० वाजता प्रसारित होणार आहे&period; उर्वरित दोन भाग १६ नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर रोजी ऐकता येणार आहेत&period;<img class&equals;"alignnone wp-image-19627 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;WhatsAppImage2025-10-31at22&period;29&period;461&lowbar;copy&lowbar;800x600&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनःपूर्वक कौतुक केले असून&comma; पालकवर्ग आणि नागरिकांकडूनही शाळेच्या या उपक्रमाचे भरभरून स्वागत होत आहे&period; या उपक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील&comma; उपायुक्त मंगेश खवले&comma;उपायुक्त संदीप चीद्रवार&comma;मुख्याध्यापक शिवलाल इरपाते&comma; उमा सुधीर कुकडपवार&comma; अस्मिता खोब्रागडे&comma; स्नेहा गुरपुडे&comma; दर्शना येरणे व संपूर्ण शिक्षकवृंद यांनी मनापासून परिश्रम घेतले&period;<&sol;p>&NewLine;<p>महानगरपालिका आयुक्त डॉ&period; विद्या गायकवाड यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की&comma; &OpenCurlyDoubleQuote;विद्यार्थ्यांच्या मनातील सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी आकाशवाणीसारखे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरते&period; या माध्यमातून मनपा शाळांचे विद्यार्थी नव्या उंचीवर झेप घेत आहेत&period;”<&sol;p>&NewLine;<p>डॉ&period; गायकवाड यांनी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील काळातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल&comma; असे सांगितले&period; हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा नसून&comma; मनपा शिक्षणाच्या दर्जेदारतेचे आणि नवकल्पनांच्या दिशेने घेतलेल्या पावलांचे प्रतिक आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version