Home Latest News निवडणूक कामात कसूर करणाऱ्यांवर मनपाची कारवाई

निवडणूक कामात कसूर करणाऱ्यांवर मनपाची कारवाई

0

<p><strong>&&num;8211&semi; आदेश धुडकावणाऱ्या मुख्याध्यापकावर फौजदारी गुन्हा दाखल  <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्तव्यात बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध मनपाने कडक कारवाईला सुरुवात केली आहे&period; निवडणूक प्रशिक्षणाचे आदेश स्वीकारण्यास नकार देणाऱ्या विविध शाळांच्या चार मुख्याध्यापकांवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्गमित केले आहे&period; डी&period;जी&period; धार्मिक&comma; एम&period; ए&period;शेख व जयश्री सलामे&comma; पुष्पा दाभेकर असे मुख्याध्यापकांची नावे आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार&comma; मनपाच्या निवडणूक विभागाने २१ डिसेंबर २०२५ रोजी मतदान अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या&period; या अंतर्गत सिव्हील लाईन्स&comma; सदर येथील मुख्याध्यापक एम&period; ए&period; शेख&comma; ईश्वर नगर&comma; रमणा मारोती रोड येथील मुख्याध्यापक डी&period;जी&period; धार्मिक&comma; मुख्याध्यापिका पुष्पा दाभेकर आणि शांती नगर येथील मुख्याध्यापिका जयश्री सलामे यांचीही नियुक्ती करण्यात आली होती&period; निवडणूक विभागाचे कर्मचारी जेव्हा त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर नियुक्तीचा अधिकृत आदेश देण्यासाठी गेले तेव्हा यांनी तो आदेश स्वीकारण्यास नकार दिला&period;<&sol;p>&NewLine;<p>सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे हा कायदेशीर गुन्हा आहे&period; याप्रकरणी मुख्यध्यापकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ &lpar;लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे&rpar; अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे&period; मनपाच्या स्वच्छता विभागातील निरीक्षकांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून अधिकृतपणे प्राधिकृत करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>निवडणूक हे लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आहे&period; यामध्ये कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा किंवा अडथळा खपवून घेतला जाणार नाही&comma; असा स्पष्ट संकेत मनपा आयुक्तांनी दिला आहे&period; यापूर्वीही निवडणूक कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत देण्यात आले होते&period; आता थेट फौजदारी गुन्हा दाखल करून मोठी कारवाई करण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version