spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपा करणार १ लाख ७५ हजार तिरंगा झेंड्यांचे वाटप – महापौर निता ठाकरे

नागपूर :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून सन २०२२ पासून “हर घर तिरंगा” ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे, ही सदर उपक्रम राबविण्यामागील मूळ कल्पना आहे. मनपाद्वारे शहरात १ लाख ७५ हजार तिरंगा झेंड्यांचे वाटप करणार आहे, नागरिकांनी देखील मोठ्या संख्येत अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे उपस्थित होत्या.

सन २०२६ मध्ये सुद्धा सदर मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यानुषंगाने सन २०२६ मध्ये हर घर तिरंगा मोहीम केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे दि. ९ ऑगष्ट पासून राबविण्याचे निर्देश राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे. मोहिमेच्या अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने निर्गमित मार्गदर्शक सुचनांचे पालन करून मा. आमदार निधी व मनपा निधीतून शहराकरीता १ लाख ७५ हजार तिरंगे झेंडे वाटप करणार आहे. त्यात मनपा शाळा विद्यार्थी आर्थिक दुर्बल भागात झेंडेच्या वाटप करणार आहे. इतर कार्यक्रम खालील वेळापत्रकाप्रमाणे नमुद सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे महापौर यांनी सांगितले.

Popular Articles