spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपाच्या ‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ चा थाटात शुभारंभ

नागपूर :- नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी (ता. २८) अत्यंत उत्साहात आणि थाटात करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक गुणांना योग्य व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी मनपाद्वारे या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

कवीवर्य सुरेश भट्ट सभागृह आर्ट गॅलरी येथे आयोजित छोटेखानी समारंभात मनपाच्या उपायुक्त मेघना वासनकर यांच्या हस्ते शिक्षणोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, उपशिक्षणाधिकारी संजय दिघोरे आणि उपशिक्षणाधिकारी सीमा खोब्रागडे यांसह सर्व शाळा निरीक्षक उपस्थित होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना उपायुक्त मेघना वासनकर यांनी सर्वप्रथम उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होण्यास मदत मिळते. तसेच भविष्यात त्यांना स्पर्धेत उतरण्याकरिता प्रोत्साहन मिळते. तर शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी सांगितले की, शिक्षणोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. या उपक्रमामुळे मुलांमधील सुप्तगुणांना वाव मिळतो आणि यामुळे शाळेची पटसंख्या वाढण्यास व टिकून राहण्यास मदत मिळते. “शिक्षणोत्सवासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शिक्षण विभागाला प्रोत्साहन मिळत असून, शाळेतील मुलांची पटसंख्या टिकून राहण्यास मदत मिळत आहे.” असे त्या म्हणाल्या.

शिक्षणोत्सवातील विविध बौद्धिक स्पर्धा दुर्गानगर मनपा शाळा येथे संपन्न झाली असून, तर सांस्कृतिक उत्सवाची प्राथमिक फेरी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडत आहे. शिक्षणोत्सवातील क्रीडा स्पर्धा येत्या यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच इतर क्रीडा प्रकार येत्या ४ ते ६ डिसेंबर दरम्यान रा.तू. म नागपूर विद्यापीठ मैदान येथे पार पडेल. कार्यक्रमाचे संचालन शुभांगी पोहरे यांनी केले.

Popular Articles