spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपा शाळेतील विद्यार्थी गिरवणार आर्थिक साक्षरतेचे धडे

– अर्थसंकल्पातील योजनांची प्रत्यक्ष कृती उतरण्यास सुरुवात

– विद्यार्थ्यांना दैनंदिन शिक्षणासोबतच आर्थिक शिक्षण

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पैशाचे योग्य व्यवस्थापन, बचतीची सवय, गुंतवणुकीची प्राथमिक समज आणि जबाबदार खर्च यांसारख्या मूलभूत गोष्टी शिकविल्या जाणार आहे. या बाबत मनपाच्या अर्थसंकल्पात स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी विद्यार्थांना आर्थिक साक्षरता देण्याची घोषणा केली होती.

लहान वयातच आर्थिक साक्षरता (Financial Literacy) विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे. पैशाचे योग्य व्यवस्थापन, बचतीची सवय, गुंतवणुकीची प्राथमिक समज आणि जबाबदार खर्च यांसारख्या मूलभूत गोष्टी बालपणातच शिकवल्यास विद्यार्थ्यांची आर्थिक विचारसरणी अधिक सक्षम बनते. यासाठी शाळांमध्ये आर्थिक साक्षरतेविषयीचे शिक्षण समाविष्ट करण्यात येईल. प्रत्यक्ष उदाहरणे, उपक्रम आणि साध्या पद्धतींनी दिलेले हे शिक्षण विद्यार्थ्यांना भविष्यात सुजाण, आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक बनण्यास मदत करेल. अशी माहिती स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी अर्थसंकल्प मांडताना दिली होती. त्यानुसार शिक्षण सभापती संतोषदेवी लढ्ढा यांनी महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रत्यक्ष कृतीला प्रारंभ केला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी पासूनच विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे गिरविल्या जात आहेत.

याबद्दल माहिती देताना संतोष देवी लड्डा म्हणाल्या की, बालपणातच आर्थिक साक्षरतेच धडे दिल्यास विद्यार्थ्यांची आर्थिक विचारसरणी अधिक सक्षम बनणार त्यामुळे साध्या पद्धतींनी दिलेले हे शिक्षण विद्यार्थ्यांना भविष्यात सुजाण, आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक बनण्यास मदत करेल. याची सुरुवात महानगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.