– सीबीआय विशेष न्यायालयाचा आदेश
यवतमाळ :- शहरात एप्रिल २००३ मध्ये बजाज यांच्या घरी माेठा दराेड पडला हाेता. या प्रकरणात पाेलिसांनी अनेकांची धरपकड केली. संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या दाेघांचा १ मे २००३ राेजी पाेलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. या घटनेत तत्कालीन पोलिस अधीक्षक अमितेश कुमार यांच्यासह पोलिस अधिकारी-कर्मचारी यांच्यावर मारहाणीचा आराेप करण्यात आला. घटनेचा सीबीआयने तपास केले. साेबतच राज्य मानवअधिकार आयाेग, व औरंगाबाद येथील पोलिस अधीक्षक राजेंद्र सिंह यांनही तपास केला. मृतकाच्या परिवाराने या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई केली जावी, अशी मागणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडे केली. न्यायालयाने तब्बल २३ वर्षांनंतर या गुन्ह्यात सहा पोलिस अधिकाऱ्या विरोधात खुनाच्या गुन्ह्याचा खटला चालविण्याचे निर्देश दिले आहेत.
अजय मधुकर माेहिते (१९, रा. यवतमाळ), सुरेश रामभाऊ साेनकुसरे (२१,रा.घुई, ता. नेर) अशी पाेलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. पाेलिसांनी बेदम मारहाण करून त्यांना विष पाजून ठार केल्याचा आराेप करण्यात आला हाेता. सीबीआयने केलेल्या तपासात या प्रकरणात तत्कालीन पोलिस अधीक्षक अमितेश कुमार इतर चार यांच्या सहभाग नसल्याचे स्पष्ट केले. तर उर्वरित सहा जणांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला हाेता. मात्र या गुन्ह्यात हत्येचा आराेपाखालीच खटला चालविण्यात यावा, अशी याचिका मधुकर माेहिते, शैलेश ठाकूर यांनी सीबीआय विशेष न्यायालय अमरावती यांच्याकडे केली.
त्यांच्यावतीने अॅड. प्रशांत देशपांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. विशेष न्यायाधीश अमित जोशी यांनी अर्ज निशानी ५५ मंजूर करून दोषारोपपत्रात दाखल आराेपी संदर्भात भारतीय दंड संहिता कलम ३०२ सहवाचता कलम ३४ अन्वये दोषारोप समाविष्ट करण्याचे निर्देश दिले. तसेच दाेषाराेपांना समाेर जाण्यासाठी सहा जणांनी न्यायालयात उपस्थित राहावे, असे निर्देश दिले आहेत.
सीबीआयने सादर केलेल्या दोषारोप पत्रानुसार यामध्ये तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक दिलदार तडवी, पोलिस उपनिरीक्षक दाेनकलवार, गवई, पोलिस शिपाई प्रभाकर काळे, शकील, गणपत गिनगुले यांच्यावर ठपका ठेवला आहे. आता त्यांच्या विरुद्ध संगणमताने खुन केल्याच्या आरोपात खटला चालणार असल्याचे अॅड. प्रशांत देशपांडे यांनी सांगितले.
तत्कालिन एसपीसह चाैघांची होणार चाैकशी
तत्कालीन पोलिस अधीक्षक अमितेश कुमार यांच्यासह चाैघांची चाैकशी होणार आहे. सीआयडी, मानवाधिकार आयोग, न्यायदंडाधिकारी यांचा अहवाल न्यायालयापुढे सादर करण्याचे निर्देश सीबीआयला दिले आहे.






