spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बेरडेपार येथे कार्तिक पौर्णिमा निमित्त तीन दिवसीय भव्य मंडई महोत्सवाला उद्यापासून सुरुवात 

किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही बेरडेपार येथील समस्त गावकरी मंडळी तर्फे उद्या मंगळवार (ता. २४ नोव्हेंबर) पासून ते गुरुवार (ता. २६ नोव्हेंबर )पर्यंत कार्तिक पौर्णिमा निमित्त तीन दिवसीय भव्य मंडई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

मंगळवार (ता. २४ नोव्हेंबर)ला सायं ५ वाजता पासून ६५ किलो वयोगटातील भव्य कबड्डी स्पर्धा, बुधवार (ता. २५नोव्हेंबर)ला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कारवा येथील ह भ प श्री हिराजी राऊत महाराज यांच्या कीर्तन व दहीकाला कार्यक्रम, रात्री ८ वाजता अमर गीताची कहाणी या नऊ अंकी नाटकाचे सादरीकरण. गुरुवार (ता. २६ नोव्हेंबर)ला सकाळी १० वाजता शाहीर मोरेश्वर यांची खडीगंमत, रात्री ९ वाजता पुणे येथील सोनिया गायकवाड यांच्या लावणीच्या कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अध्यक्ष राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार कृपाल तुमाने, टेकचंद सावरकर, बिकेंद्र महाजन, प्रसन्ना तिडके, भगवान बावनकुळे ,योगेश देशमुख, मुकेश अग्रवाल, संकेत बावनकुळे, अशोक हटवार ,सदानंद निमकर, राहुल किरपान, अनिल निधान, प्रशांत भुरे, रोशन उमप, विशाल सेलोकर, विष्णू देशमुख, सागर गोमासे, रमेश बरकते, दत्तात्रय निंबाळकर ,महेश बेहेकर,बी पी लोणारे, मीनाक्षी घोरपडे ,उज्वला पठाडे ,कैलास मोथरकर, आनंदराव नंदनवार,अमोल डहाके, प्रवीण भेंडे उपस्थित राहणार असून या तीन दिवसीय भव्य मंडई उत्सवानिमित्त आयोजित भरगच्च कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान बेरडेपार सरपंच रेवानंद देशमुख, उपसरपंच विनोद टाकळखेडे, सचिव अश्विनी लोखंडे ,सदस्यगण सदाशिव उईके, नीरज डोईफोडे, उषा चिचाम, किरण नाटकर, वैशाली घोंगडे सह समस्त बेरडेपारवासियांनी केले आहे.

Popular Articles