– भाजपा आध्यात्मिक आघाडीचे आयोजन
कार्तिकी एकादशी निमित्त न्यू नंदनवन येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भाजपा आध्यात्मिक आघाडी नागपूर महानगर द्वारे वारकरी भजन मंडळांच्या नामस्मरण दिंडीने संपूर्ण संपूर्ण परिसरात विठ्ठलभक्तीचा जागर करण्यात आला. महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाचा कार्तिकी एकादशी निमित्ताने वारकरी दिंडीचे पूजन नगरसेवक गणेश चारलेवर यांचे हस्ते करण्यात आले. दिंडीच्या माध्यमातून भाविकवृंद एकत्र येऊन भक्तीपूर्ण वातावरणात भक्ती ,एकता, समानता, निर्मळता अशा अनेक मूल्यांचे प्रदर्शन करतात याचा प्रत्यय आला. परिसरातील पालखी मार्ग विठ्ठल भक्तांनी सडे शिपडून, फुलांनी, रांगोळ्यांनी सुशोभित होता. दिंडीत घोष, टाळ मृदंग, भगवे ध्वज, पर्यावरण संवर्धनाची फलके इत्यादीच्या माध्यमातून दिंडीचे दृश्य साकारले. यावेळी श्री सद्गुरू सेवातीर्थ फाऊंडेशन, माऊली भजन मंडळ, संत एकनाथ भजन मंडळ, वारकरी महिला भजन मंडळ अश्या २१ भजनी मंडळांनी दिंडीत सहभाग घेऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी या नामस्मरणात अवघ पंढरपूर अवतरल्याचा आनंद नागरिकांनी अनुभवला. पालखीचे षोडशोपचार पूजन पौरोहित्याखाली विष्णुसहस्रनाम पठणाने मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर हरीपाठ पठण करून महाआरती करून प्रसाद वितरण करण्यात आले.
या वारकरी दिंडीच आयोजन भाजपा आध्यात्मिक आघाडीचे डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले असून दिंडीच्या यशस्वी नियोजनासाठी चंद्रशेखर दुबे, सुजाता काथोटे, दर्शना नखाते, सुजाता खंबाता, राजश्री गोरे,ज्योती हराड,कृष्णाजी डोमके, अभिजित कथाले, राहुल पद्मावत, योगेश ढबाले, विश्वनाथ कुंभलकर,समृद्धी वराडपांडे, किरण सारंगपुरे,आदींनी परिश्रम घेतले.






