किशोर साहू, मौदा :- महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शनिवार (ता.२० नोव्हेंबर)ला दीपावली मिलन निमित्य कोदामेंढी-अरोली व खात-रेवराल या जि प क्षेत्रातील गावांमध्ये गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी तोंडली जि प शाळेला भेट देऊन शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक करून, शाळेच्या नावीन्यपूर्ण वाटचालीची दखल घेत भौतिक सुविधांबाबत सकारात्मक चर्चा केली. याप्रसंगी माजी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे, गट ग्रा पं तोंडली सरपंचा दर्शना बागडे, उपसरपंच रामपाल धांडे, मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे सह गावातील व तालुक्यातील शासकीय अधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Latest News
Related Posts
महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तोंडली जि प शाळेला भेट






