नागपूर :- सन्मार्ग नगर क्र. १ हुडकेश्वर रोड नागपूर येथील, श्री हनुमान मंदिर देवस्थान येथे परमपूज्य जगदंबा माता व श्री हनुमान महाराज यांच्या कृपेने बुधवार दि. 18 नोव्हेंबर ते मंगळवार 24 नोव्हेंबर पर्यंत, संगीतमय श्रीमद् देवी भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सात दिवसीय धार्मिक सोहळ्यांमध्ये भागवताचार्य तथा वेदांताचार्य हभप तीरथ उपाख्य दादा महाराज पु. बाराहाते (उज्जैन ) नागपूर यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् देवी भागवत कथेचे निरूपण करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून जगदंबा मातेची महंती, देवीचे विविध अवतार, भक्ती, ज्ञान, धर्म, संस्कार, अध्यात्मिक, जीवन मूल्यांचा संदेश, भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. कार्यक्रमा दरम्यान दररोज सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत काकड आरती सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत हरिपाठ आणि सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत श्रीमद देवी भागवत कथा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
Latest News
Related Posts
सन्मार्ग नगरात श्री हनुमान मंदिरात बुधवारपासून संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन






