spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागलवाडी शाळेची सहल व क्षेत्रभेट, जंगल सफारी, अनेक वन्य प्राण्यांचे दर्शन, विविध प्रजातीचे वनस्पतीची ओळख, वनभोजनाचा आस्वाद

खापा :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नागलवाडी या शाळेची शैक्षणिक सहल व क्षेत्रभेट (दि. २३) शुक्रवारला पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र नागलवाडी येथील वनास भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना अनेक प्राण्यांचे दर्शन घडले. जंगलातील अनेक प्रजातीच्या वनस्पतीची ओळख करून घेता आली.

पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरचे सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) संदीप भारती तसेच नागलवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व वन्यप्राणी, वन्यजीव, औषधीयुक्त वनस्पती, वनांचे फायदे यावर चर्चा संवाद घडवून आणला. तसेच क्षेत्र सहाय्यक सुनील भोयर (एसटीपीएफ) वनरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जंगल सफारी घडवून आणली.

यावेळी विद्यार्थ्यांना अनेक वन्य प्राणी दिसले. 15 किमी वनभ्रमण करताना विविध प्रजातीचे वनस्पती वन्य प्राण्याचे पायाचे ठसे दाखविण्यात आले. जंगलात वन्य प्राण्यांच्या मुक्त संचार कसा होतो हे सुद्धा दाखविण्यात आले. दूरचित्रवाणी द्वारे वनातील प्राणी, वनस्पती, ऋतुचक्रानुसार वन्य प्राण्यांचा संचार, त्यांचे निवारे, जंगलातील मचवे, वनांची गणना करण्याची पद्धती विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.

याप्रसंगी वनभोजन देण्यात आले. संपूर्ण वनक्षेत्र भेटीमध्ये गाईड प्रपिल, आनंद व जिप्सी चालक लतिश हिंगे, रजत भलावी यांनी मोलाची भूमिका बजावली. मुख्याध्यापक प्रभू कारोकार यांनी सर्वांचे आभार मानले.

Popular Articles