किशोर साहू, मौदा, ता. २५ :- चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नेरला येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय मंडई उत्सवापूर्वी आयोजित शनिवार (दि. 24 जानेवारी) पासून सुरू झालेल्या, नवयुवक सांस्कृतिक मंडळ व समस्त गावकरी नेरला तर्फे आयोजित दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

उद्घाटनीय कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपा चाचेर मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण, ग्रा.पं.खंडाळा सरपंच संकेत झाडे, माजी उपसभापती खेमराज चाफले ,माजी सरपंच तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मौदा प्रमोद बरबटे, उपसरपंच रोशन मेश्राम,मनोज नौकरकार , माजी सरपंच मोमदेव देशमुख ,बंडु वाणी, कुणाल खोब्रागडे , गावकरी मंडळी व महिला मंडळी उपस्थित होते.









