सात वर्षांपासून सुरू असलेली पदयात्रा यंदाही मोठ्या भक्तिभावात
हिंगणा १८ : हिंगणा तालुक्यातील एमआयडीसीमधील आयसी चौकाजवळील गेडाम लेआउट येथील नागोबा मंदिरातून सलग सात वर्षांपासून श्री नागवाशुकी सेवा समिती व हरिहर सेवा मंडळ, आयसी चौक, हिंगणा रोड, नागपूर यांच्या वतीने नागपूर ते नागद्वार अशी पदयात्रा आयोजित केली जाते. यामध्ये परिसरातील शेकडो युवक व भक्तगण श्रद्धेने सहभागी होतात.
यावर्षी बुधवार दिनांक १६ जुलै रोजी पदयात्रेची सुरुवात प्रमुख अतिथी अक्षू पायल नंदगिरी (जगवाले), नागपूर आणि भाजपा युवा नेते विनोद ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. या कार्यक्रमाचे आयोजन विजय (बॉबी) डाहाके (अध्यक्ष), पंकज अबादे (सचिव), तसेच सुनिल पधान, विक्की हुरळे, किशोर ऊगडे, किशोर झाडे, शंकर वजारी, अजय गवडी, अजय किर्वे, हिरामन मोहड, वसंत पटले, संपत्ती पटले, शुरया, शरणागत, अजय राम, शबनम ठाकूर, शुभम कनोजीया, धीरज सिंग, भारत चव्हाण, मिथिलेश पासवान, चंदनसिंग, रोहित मेशराम, भगवान झा, शिवरुद्र, दिगंबर खुशपारे, खुजनारे, गजु पाडे, सजु कोल्हे, हबलु चतुर्वेदी, ईनेश श्रीवास्तव, गोलू हारोडे, आकाश, रावण भारद्वाज, अजय वाल्मिक, भैयाजी हरिनखेड, राजेश, सौरभ मोहड, रोशन वडुळे, सचिन फलके, अनुप डाभरे, सूरज पांडे, ऋषभ आणि इतर अनेक कार्यकर्त्यांच्या सहभागाने उत्साहात पार पडली.ही पदयात्रा भक्ती, एकात्मता आणि परंपरेचे प्रतीक बनली असून, दरवर्षी वाढत्या संख्येने भक्तगण सहभागी होत आहेत.




