spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर डिजिटल पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर; पहिली बैठक संपन्न

– विजय ठाकूर अध्यक्षपदी तर मुकेश हेडाऊ सचिव आणि प्रकाश रंगारी यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड 

नागपूर :- नागपूर डिजिटल पत्रकार संघाची (एनडीपीएस) पहिली बैठक शनिवारी सिव्हिल लाइन्स येथील पत्रकार (प्रेस) क्लब, नागपूर येथे उत्साहात पार पडली. बैठकीत संघाच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यामध्ये विजय ठाकूर यांची अध्यक्षपदी तर मुकेश हेडाऊ यांची सचिवपदी आणि प्रकाश रंगारी यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच उन्मेष पवार व निलेश फरकाडे यांची उपाध्यक्ष, इम्रान शेख व गिरीश ठाकरे यांची संयुक्त सचिव, तर दिव्येश द्विवेदी यांची संघटन सचिव म्हणून निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून रूपा पंडित, क्षितिजा देशमुख, विकी सोमकुवर, नीता सोनवणे, विकास जिवने, महेश नागपुरे, श्रीकांत कुरुंभटे, राजकुमार मोहोड आणि नागेश तितरमारे यांची निवड करण्यात आली. नागपूर डिजिटल पत्रकार संघ हा महाराष्ट्र युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट्स (MUWJ) तसेच नागपूर युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट्स (NUWJ) यांच्याशी संलग्न आहे. बैठकीचे संचालन पत्रकार क्लब, नागपूरच्या गव्हरर्निंग बॉडीचे सदस्य सनी शेंडे यांनी केले तर रणजित देशमुख यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित सदस्यांनी डिजिटल पत्रकारितेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच कार्यरत पत्रकारांच्या हक्क आणि हितसंरक्षणासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Popular Articles